धुळे राजमुद्रा वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसापासून धुळे महापालिकेच्या महापौर पदा करिता राजकीय पक्षांचा सुरू असलेला कलगीतुरा अखेर संपला आहे धुळे महापालिका भाजपच्या हातातून जाणार अशा चर्चांना उधाण आले असताना भाजपाचे प्रदीप करपे यांची बहुमताने निवड झाली आहे. भाजपच्या प्रदीप करपे यांनी 50 नगरसेवकांची मते घेऊन विजयी झाले आहे या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष शेवटपर्यंत वाऱ्यावरच राहिल्याने त्या निवडणुकीत भाजपने पुन्हा महापौरपद आपल्या पारड्यात खेचून आणले आहे.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा एकही उमेदवार तटस्थ राहिला व बसपा उमेदवारही या निवडणुकीत तटस्थ राहिला आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा पीठासीन अधिकारी होते. आयुक्त देवदास टेकाळे, नगर सचिव मनोज वाघ यावेळी उपस्थित होते नगरसेवकांनी ऑनलाइन मतदान केले या प्रक्रियेत 73 नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला, भाजपचे सर्व 50 नगरसेवक एक संघ ठेवण्यात भाजपला यश आले आहे.