जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजीनामा नाट्यानंतर राष्ट्रवादीच्या नाराज गटाने थेट अजितदादांना मुंबईत गाठून आपले गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आमची देखील बाजू नेमकी काय आहे, हे अजितदादांनी समजून घ्यावे म्हणून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात आल्याची माहिती यावेळी समोर आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी कल्पना पाटील यांनी राष्ट्रवादी कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत नेमके प्रकरण काय ? याबाबत आपली भूमिका मांडली आहे. आमच्या विरोधात व्यक्तिगत पातळीवर सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या पोस्ट तसेच स्थानिक पातळीवर करण्यात आलेले ट्रोल याबाबत उपमुख्यमंत्री अजित दादांना पुराव्यासकट माहिती दिल्याचे प्रदेश महिला पदाधिकारी कल्पना पाटील यांनी राजमुद्राशी बोलताना सांगितले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याभोवती राष्ट्रवादीत ल्या ज्येष्ठ विरोधातील वाद फिरत असून याबाबत थेट वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आलेली आहे. अभिषेक पाटील यांच्यासह संपूर्ण शहरात च्या पदाधिकारी यांनी राजीनामा सत्र सुरू केल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. मी ज्येष्ठांच्या त्रासाने कंटाळून राजीनामा देत असल्याचे अभिषेक पाटील यांनी राजीनामा पत्रात नमूद केले होते.
यावरून ज्येष्ठ विरुद्ध युवा असा वाद पेटला होता हा वाद थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांनी थेट राजीनामा देऊन दबावतंत्र वापरण्यावरून खरडपट्टी केली होती. ‘कोणाच्या जाण्याने पक्षाला काही फरक पडत नाही असे देखील त्यांनी जळगावच्या एका कार्यक्रमात कॉन्फरन्सद्वारे वक्तव्य केलं होतं. यावरून आज प्रदेश महिला पदाधिकारी कल्पना पाटील यांनी घेतलेली अजितदादांचे भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. नेमकं अजित पवार याबाबत काय म्हणाले हे अद्याप कळू शकले नाही. मात्र काही विषयांवर चर्चा झाल्यानंतर कल्पना पाटील यांना पवारांनी समजून घेतल्याचे कळतंय.