मुंबई | राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार असून महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागा बाबत भाजपकडून कोण लढवणार याबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे माझ्याकडून संजय उपाध्य निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे
संजीव पाध्ये यांच्या राजकारणाची सुरुवात भाजपा युवा मोर्चा तून झाली आहे. आईकडे भाजप प्रदेश कार्यकारणी मध्ये होते ते भाजपाचे मुंबई सरचिटणीस आहे. तसेच उत्तर भारतामध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून व्यूहरचना आखली जात असल्याचे त्याचाच एक भाग म्हणून उपाध्याय यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे यासाठी कार्यक्रम देखील जाहीर केला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडूमध्ये तसेच बंगाल, आसाम आणि मध्यप्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. त्या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 सप्टेंबर आहे. चार ऑक्टोंबर ला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल देखील लागणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आले आहे.