जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिका क्षेत्रातील संजय गांधी निराधार योजनेचे तत्कालीन तहसीलदार नामदेव पाटील यांची प्रभारी ऐवजी कायम तहसीलदारपदी नियुक्तीचे आदेश नुकतेच राज्य शासनाने काढले आहे अकरा महिन्यांचा जळगाव तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळल्यानंतर त्यांच्याकडे तहसीलदार पदाचा कार्यभार प्रभारी ऐवजी कायम सोपविण्यात आला आहे.
तहसीलदार वैशाली हिंगे यांची 26 ऑक्टोंबर 2020 रोजी शासनाने सरदार सरोवर प्रकल्प नंदुरबार येथे उपसचिव म्हणून बंद केल्यानंतर मनपा क्षेत्रातील संजय गांधी निराधार निराधार योजनेचे तत्कालीन तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे जळगाव तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांचे शासनाने 14 सप्टेंबर रोजी जळगाव मनपा क्षेत्रातील संजय गांधी निराधार योजना तहसीलदार पदी नियुक्ती केल्यानंतर प्रभारी तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे जळगाव तहसील चा पदभार कायम देण्यात आला आहे.
कुळकायदा शाखेचे तहसिलदार महेंद्र माने यांच्याकडे जळगाव तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार दिला होता. देवरे यांच्या बदलीच्या आदेशात तहसीलदार पाटील यांच्या प्रस्तावित बदलीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर बदली केल्याचे नमूद केले होते. पाटील यांच्या प्रस्तावित बदली जळगाव तहसीलदार म्हणून करण्यात आल्याचे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.