जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | गुजराल पेट्रोल पंप येथील नव्याने होत असलेल्या उड्डाण पुलाला वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव द्यावे असे मागणीचे निवेदन आज महापालिकेत महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभूषण पाटील यांना समस्त समाज शिंपी समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले.
जळगाव शहर शिंपी समाज अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपाध्यक्ष विवेक, सचिव चंद्रकांत जगताप, प्रिंपाळा शिंपी उपाधयक्ष रूषिकेश कापुरे, समाज बाधंव जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय कापुरे अ. भा शिंपी समाज उपाध्यक्ष मुकुंदराव मेटकर, मा अ. भा युवक अध्यक्ष मनोज भांडारकर, गणेश मेटकर, सुरेश सोनवणे,अनिल खैरनार, प्रविण कापुरे , वाडि परिसर अध्यक्ष शैलेंद्र मांडगे, शिवदास आबा सावळे यांनी दिले व या प्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.