मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा : मुखमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या पात्राला पत्रानेच उत्तर दिले आहे. राज्यातील कायदा सु व्यवस्तेची स्थिती गंभीर असल्याचे म्हणत विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यपालांनी पात्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली होतो. उध्दव ठाकरे यांनी आता पलटवार करत हा विषय साकी नाक्यापुरता मर्यादित असून राष्ट्रव्यापी आहे त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठया आशेने पाहत आहेत म्हणून राष्ट्रातील महिला आत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे. तशी मागणी आपण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहानकडे करावी असे म्हटले आहे. तसेच महिलांवरील अत्याचार बलात्कारासारख्या घटना राज्य, देश व समाजाला कलंकित करतात याची जाणीव मला आहे.
साकी नाल्यातील घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकार कठोर पावले टाकत आहे. पण महिलांवरील वाढते अत्याचार, हत्या हा राष्ट्रव्यापी विषय असून त्यावर त्या पातळीवर चर्चा व्हायला हवी. तसेच हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे अशी मागणी राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान व गृहमंत्री यांच्याकडे करावी अशी मागणी करण्यात आली आहे.