जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यातील नशिराबाद येथे नुकतेच जा मीन झालेल्या दोघा पिता पुत्रावर हल्ला चढवण्यात आला आहे यामध्ये पुत्राला बंदुकीची गोळी लागल्याने जागीच ठार झाला असून ती त्याला गोदावरी महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पिता असलेल्या मनोहर सुरळकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहिती नुसार, मागील वर्षी ११ ऑक्टोबर २०२० रोजी भुसावळ येथील कैफ शेख जाकीर याचा खून झाला होता. त्याच्या खुनाच्या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. यातील एक संशयित धम्मप्रिया मनोहर सुरळकर हा जळगाव जिल्हा कारागृहात होता. दरम्यान मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी त्याला जामीन मिळाला. त्याच्या जामिनासाठी त्याचे वडील मनोहर आत्माराम सुरळकर (वय ४७, राहणार पंचशील नगर,भुसावळ) हे आले होते. धम्माप्रियाचा जामीन झाल्यावर ते घराकडे परतत जात असताना नशिराबादच्या पुलाजवळ संशयित मारेकरी समीर शेख जाकीर, चादर वाल्याचा मुलगा (पूर्ण नाव माहित नाही) व आणखी एक जण दबा धरून बसले होते. दोघेही पितापुत्र पुलाजवळ आले असता त्यांनी अचानक दोघा पितापुत्रावर हल्ला चढविला. यात त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या तर चोपर, चाकूने सपासप वार करीत पिता-पुत्रांना बचावाची संधी दिली नाही. यात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले आहे. पोलिसांनी आपली तपास चक्रे गतिमान केली असून कसून चौकशी करण्यात येत आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आपल्या सूत्रांच्या माध्यमातून तपास चक्रे फिरवली असून नेमके ते अज्ञात मारेकरी कोण याबाबत तपास केला जात आहे पूर्व वादातून हा हल्ला झाला आहे का याचा देखील तपास पोलिस करत आहे नेमकं हल्ला चढवणाऱ्या अज्ञात मारेकर्यांनी कोणते रिवाल्वर वापरले याची देखील कसून चौकशी सुरू आहे.