जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यातील नशिराबाद नजीक झालेल्या खुनाने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. पिता – पुत्रावर झालेंल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण जिल्ह्यात दहशतीचे वातावरण आहे. सतत होणाऱ्या खुणांच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुरुंग लागला आहे, आता पर्यत झालेंल्या खुनाच्या घटनेत सर्वाधिक शस्र म्हणजे पिस्तुल वापरल्याचे निरदर्शनास येत आहे. मात्र याबाबत पोलीस प्रशासन गंभीर आहे का ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. गल्लीबोळातील युवकांकडे देखील पिस्तुल आढळून येत असल्याने नेमकं काय घडेल ? याबाबत जिल्ह्यातील गोपनीय विभाग संभ्रमात आहे. या अगोदर होणाऱ्या घटनांचा अनेक वेळा खालोसा पोलिसांना लागत होता मात्र आता गोपनीय विभागातील कामकाजावर देखील याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आतापर्यंत झालेले भ्याड हल्ले तसेच होणारे खून यामुळे जळगाव जिल्ह्याला पिस्तुलगांव जिल्हा म्हणून नवीन ओळख मिळाल्या शिवाय राहणार नाही. या सर्व रॅकेटचा पर्दाफाश करणे गरजेचे आहे.
काय आहे घटना ?
मिळालेल्या माहिती नुसार, मागील वर्षी ११ ऑक्टोबर २०२० रोजी भुसावळ येथील कैफ शेख जाकीर याचा खून झाला होता. त्याच्या खुनाच्या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. यातील एक संशयित धम्मप्रिया मनोहर सुरळकर हा जळगाव जिल्हा कारागृहात होता. दरम्यान मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी त्याला जामीन मिळाला. त्याच्या जामिनासाठी त्याचे वडील मनोहर आत्माराम सुरळकर (वय ४७, राहणार पंचशील नगर,भुसावळ) हे आले होते. धम्माप्रियाचा जामीन झाल्यावर ते घराकडे परतत जात असताना नशिराबादच्या पुलाजवळ संशयित मारेकरी समीर शेख जाकीर, चादर वाल्याचा मुलगा (पूर्ण नाव माहित नाही) व आणखी एक जण दबा धरून बसले होते. दोघेही पितापुत्र पुलाजवळ आले असता त्यांनी अचानक दोघा पितापुत्रावर हल्ला चढविला. यात त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या तर चोपर, चाकूने सपासप वार करीत पिता-पुत्रांना बचावाची संधी दिली नाही. यात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले आहे. पोलिसांनी आपली तपास चक्रे गतिमान केली असून कसून चौकशी करण्यात येत आहे.दरम्यान दोघा संशयित आरोपींना पोलिसांना अटक केल्याची माहिती मिळतं समोर आली आहे.
अंकुश नाही ?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात घालून दिलेल्या निर्बंधांची अमंलबजावणी करण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांवर सर्वाधिक कारवाया झाल्या मात्र गुन्हेगारी क्षेत्रात वावरत असलेल्या टोळ्या कडे जिल्हा पोलीस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते, घटना घडतात पोलीस गुन्हेगारांना अटक देखील करतात मात्र तेच गुन्हेगार पुन्हा जामिनावर सुटल्यावर गुन्ह्याची मालिका त्यांची सुरू असते , या सर्व परिस्थिती वर अंकुश आणण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे.