चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खा. उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतून युवा सामाजिक कार्यकर्ते अजय वाणी यांच्या पुढाकारातून मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन आज शहरातील लाडशाखीय वाणी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.लाडशाखीय वाणी समाज,लाडशाखीय वाणी समाज सेवाभावी चैरीटेबल ट्रस्ट, लाडशाखीय वाणी समाज युवा मंच, लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ ,गुरुदत्त सहकारी पतसंस्था, किराणा भुसार व्यापारी असोसिएशन चाळीसगाव यांच्या सहकार्याने कोवीड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण शिबिराला उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. संपदा उन्मेश पाटील यांनी भेट देऊन लसीकरण घेण्यासाठी आलेल्या शहरवासीयांशी संवाद साधला. याप्रसंगी समाज अध्यक्ष शरद मोराणकर, सचिव तथा जेष्ठ पत्रकार सी .सी.वाणी सर , सर्वेश पिंगळे, रोहित कोतकर, लोंजे ग्रा प सदस्य अनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.