जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : रिक्षा चालक मालकांनी बुधवारपासून व्यवसाय करीत असतांना गणवेश कागदपत्रे सोबत ठेवावे अन्यथा कठोर कारवाई केली जाणार असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे. शहरात अनेक रिक्षा चालक भाडेतत्वावर रिक्षा घेऊन व्यवसाय करीत आहे त्यामुळे त्यांच्याकडे मूळ कागदपत्रे नसतात . गणवेश परिधान करीत नाहीत. नेमून दिलेल्या थांब्यावर रिक्षा उभी करीत नाहीत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. असे निदर्शनास आल्यामुळे वाहतूक शाखेने सूचना जरी केल्या आहेत.
आता नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करणारा आहेत . दरम्यान कोरोना लोकडाऊनच्या काळात रिक्षा वाहतुकीला सवलत दिल्यानंतर शहरात रिक्षामध्ये लुटमारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या . रिक्षा चालक ठरवून दिलेल्या थांब्यावर थांबत नाहीत. ते वाटेल तेथे रिक्षा उभी करत असतात. या प्रकारामुळे वाहतुकीची अनेक वेळा कोंडी देखील होत असते. या सर्व प्रकारची दखल घेऊन आणि रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी शहरवाहतूक शाखेने गणवेश व कागद पात्रांचा निर्णय घेतला आहे.