जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : केंद्र शासनाने नुकतेच नव्याने सहकार मंत्रालय सुरु केले आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान राज्यातदेखील सहकार क्षेत्र भक्कम करण्यासाठी राज्याने कंबर कसली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सहकार क्षेत्रात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सहकार सेल सुरु केले आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी सेल ग्रामीण जिल्हाधक्ष्य पदी वाल्मिक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार विभागाचे प्रादेशाध्यक्ष डी . वाय . पगारे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले.
वाल्मिक पाटील हे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक तसेच नियोजन मंडळाचे सदस्य आहेत. सहकार क्षेत्रातल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी सहकार विभाग कार्याविन्त झाला आहे.