(राजमुद्रा वृत्तसेवा) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा दिला. देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधींना पाठवलेले हे पत्र म्हणजे महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा एक प्रयत्न असून फडणवीस मुंबई पॅटर्नवर जसे बोललात, तसेच गुजरात पॅटर्न वर पण बोलणार का? असा सवाल NCP नेता नवाब मलिक यांनी फडणवीस यांना केला आहे.
महाराष्ट्राच्या कामाची देशभरामध्ये सतत प्रशंसा होत आहे. ही होणारी प्रशंसा यांना पचनी पडत नसून महाराष्ट्राचे होणार नाव त्यांना सहन होत नाही असे नवाब मलिक म्हणाले. ज्याप्रमाणे फडणवीस आज महाराष्ट्र पॅटर्न वर बोलत आहेत, त्याप्रमाणे गुजरात वर बोलणार का? गुजरातमध्ये गेल्या 71 दिवसात 61 हजार मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. गुजरातने मृत्यूचे हे आकडे दाबले आहेत. यावर फडणवीस बोलणार का असा सवाल यांनी केला आहे. मोदी सरकार कोरोना रोखण्यात अपयशी झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फार मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे मृत्यू होत आहेत. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात फडणवीस आरोप करत आहेत त्याचप्रमाणे गुजरातच्या कोरोना मृतांचा आकडा फडणवीस यांनी बघायला हवा. पत्र पाठवले म्हणजे सत्यता बदलत नाही. गुजरातच्या स्थानिक वृत्तपत्रांचा अभ्यास करा तुम्हला त्यात 61 हजार मृत्यू फक्त गुजरात मध्ये झाल्याचे आढळेल असेही मलिक म्हणाले.