अमळनेर राजमुद्रा वृत्तसेवा : अमळनेरच्या उद्योगांच्या विस्तारीकरण व वाढीसाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन स्तरावर निधी मिळावा असा प्रस्ताव केंद्रीय लघु इ उद्योग मंत्री नारायण राणे यांना जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा वकील ललिताताई पाटील आणि कृषीउत्पन्न बाजार समितीचे संचालक पराग श्याम पाटील यांनी दिला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ललिताताई पाटील यांच्यात या प्रस्तावर चर्चा होऊन सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगण्यात आले.
अमळनेरच्या औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण व वाढीसाठी मूलभूत सुविधा करण्यासाठी शासन स्तरावर निधी मिळावा याकरिता ललिताताई पाटील यांचे अनेक दिवसापासून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि अमळनेर सहकारी औद्योगिक वसाहत या संस्थेची स्थापना होऊन शासकीय जमिनीवर उद्योगांसाठी १९८० साली प्लॉट वितरित झाले आहेत. या शासकीय जागेवर लहानमोठे असे ७५ उद्योग कार्यान्वित होऊन अनेक कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. संस्थेच्या उत्पनाचे कोणतेही साधन नसल्याने उद्योजकांना मूलभूत सुविधा रस्ते, लाईट, गटारी, पाणी पुरवठा आदी पुरविण्यास अडचण निर्माण झाली आहे. केंद्रसरकारने कोरोना काळात एम.एस.एम.इ. सेक्टर साठी दिलेला मदतीचा हात व शासकीय धोरणास अनुसरून कोरोना कालावधीत देखील उदोजाकानी आपले उद्योग चालवून कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. परंतु उद्योजकांना मूलभूत सुविधा नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच उद्योगांची वाढ व विस्तारीकरण देखील खुंटलेले आहे. असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर संस्थेचे चेअरमन जगदीश लोटन चौधरी आणि व्यवस्थापन वसंत वामनराव मराठे त्यांच्या स्वाक्षरी आहेत.
लवकरच हा विषय निकाली लागण्याची श्यक्यता वर्तवण्यात आली असून अमळनेरच्या उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.