जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : जळगाव शहरात अतिक्रमण हटवितांना शासकीय कामकाजात अडथळा आणून मारहाण केल्याच्या आरोपावरून सामाजिक कार्यकर्ते होनाजी चव्हाण यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. न्यायाधीश व्ही. बी. बोहरा यांच्या कोर्टात कामकाज होऊन होनाजी चव्हाण यांना दोषमुक्त करण्यात आले. कोर्टात बचाव पक्षाच्या वतीने विधी तज्ज्ञ महेश भोकरीकर व रवी गुजराथी यांनी तर सरकारी पक्ष्याच्या वतीने वकील भारती खडेस यांनी कामकाज पहिले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अजय लोखंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.