जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ शुक्रवार 24 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जळगाव शहरात शुक्रवार दि. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नगर नामकरण व फलक अनावरण सोहळा. स्थळ – महात्मा फुले नगर, पोलनपेठ, जुने बसस्थानकाजवळ, जळगाव. रात्री 8 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व मुक्काम.
शनिवार, 25 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 9 वाजता अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक स्थळ – अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव, सकाळी 10 वाजता, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जळगाव शहर व जिल्हा बैठक, स्थळ – राष्ट्रवादी भवन, आकाशवाणी चौक, जळगाव, सकाळी 11.30 वाजता, ओबीसी बहुजन हक्क परिषद, स्थळ – छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव दुपारी 1 वाजता, पत्रकार परिषद – स्थळ : छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव, दुपारी 1.30 वाजता मोटारीने हरेश्वर नगरकडे प्रयाण, दुपारी 1.45 वाजता, हरेश्वर नगर येथे आगमन व राखीव, स्थळ :- पियूष हॉस्पिटल, 28 हरेश्वर नगर, बँक ऑफ बडोदा समोर, रिंगरोड, जळगाव. दुपारी 3.00 वाजता मोटारीने धुळेकडे प्रयाण.