मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा : आगामी होणाऱ्या नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांनमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे राज्यसरकारने आधी हा निर्णय रद्द करण्याच्या निर्णया विरुद्ध केल्याचे बोलले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील नगरसेवकांमध्ये कही ख़ुशी कही गम झाले आहे तर शासनाच्या या नव्या अध्यादेशाचे स्वागत केले आहे.
प्राप्त माहितीनुसार गेल्या पंचवार्षिक मध्ये तत्कालीन फडवणीस सरकारने राज्यातील नगरपालिका आणि महापालिकामध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला होता तर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा निर्णय रद्द करण्या आला शासनाने या संदर्भात ३१ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २०१९ अन्वये सर्व महानगरपालिकांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागु केली होती. याबाबतचा शासन निर्णय देखील जाहीर झाला होता. मात्र न्यायालयाने कोरोनाचे कारण देऊन निवडणूक पुढे ढकलल्यास नकार दिल्याने निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. या निवणुका वेळेत घ्यावयाच्या असल्यास नवीन पद्धती प्रभाग रचणे साठी वेळ लागेल. यामुळे हि समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने आधी प्रमाणेच बहुसदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.