जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | कांचन नगर परिसरात राहणाऱ्या तरुणावर घरात घुसून चार जणांनी पिस्तुल चालून हल्ला चढवल्याने एकच खळबळ उडाली आहे गवळीवाडा नजीक राहणाऱ्या या तरुणावर एकूण चार जणांनी सहा फेऱ्या झाडून पिस्तोलीने हल्ला चढवल्याने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. मात्र ह्या हल्ल्यात हल्लेखोरांचा प्लॅन फसल्याने घटनास्थळावरून काढता पाय घेत पसार झाले त्यातील एक संशयित मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
सविस्तर वृत्त असे की, माजी महापौर अशोक सपकाळे यांचा पुत्र राकेश अशोक सपकाळे याचा काही दिवसापूर्वी ममुराबाद रस्ता नजीक असलेल्या एका अरुंद पुलावर खून करण्यात आला होता स्मशानभूमी नजीक दबा धरून बसलेल्या काही टोळक्यांनी राकेश ला रस्त्यात घडवत त्याच्यावर वाद घालण्याचा प्रयत्न केला या वादातून राकेश वर चापर ने हल्ला करीत मानेवर वार करण्यात आले होते. यामुळे राकेश प्रचंड जखमी झाला होता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून संशयित मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले होते. राकेश जागेवरच गतप्राण झाला होता. या घटनेतील काही आरोपी जामिनावर सध्या बाहेर आहे.
आकाश मुरलीधर सपकाळे रा. कांचन नगर, गणेश दंगल सोनवणे रा. वाल्मिक नगर, विशाल संजय सपकाळे रा.राजाराम नगर महेश राजू निंबाळकर यांना अटक करण्यात आली होती मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करून केला आहे. या घटनेची संबंधित असणाऱ्या आकाश मुरलीधर सपकाळे वर आज आहे घरात घुसून हल्ला करीत पिस्तूल चालवली आहे, या घटनेची राकेशच्या खून खटल्याचा संबंध असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपली तपास चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे. सकाळी आठ वाजता झालेल्या हल्ल्यामध्ये आकाश बचावला आहे यादरम्यान बंदुकीची गोळी बोटाला शिरून गेल्याने दुखापत झाली आहे.
माहितीनुसार सकाळी आठच्या सुमारास आकाश आणि त्याचा भाऊ हे घरात झोपलेले होते. त्यांचा भाऊ हा जागी होता. अचानक तीन-चार तरूण घरात आले व त्यांनी गोळीबार सुरू केला. आकाशच्या भावाने तात्काळ यातील एका हल्लेखोराला पकडून धरले. यामुळे ते नंतर गोळीबार करू शकले नाही. मात्र आकाशच्या करंगळीला गोळी लागल्याने त्याला जखम झाली. लागलीच हल्लेखोर घरातून बाहेर पडून दुचाकींवरून पळून गेले. मात्र त्यातील एक जण हा घराबाहेर धावतांना पायर्यांवरून पाय घसरून पडला. यामुळे तो तिथेच बेशुध्द होऊन पडला. त्याच्या बाजूलाच पिस्तल, मोबाईल आणि काडतूस पडले. त्याला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. या हल्ल्यात चार जणांनी सुमारे सहा फैरी झाडल्याची माहिती मिळाली आहे.
अचानक झालेल्या बंदुकीच्या आवाजाने आवाज ऐकून परिसरातील लोक धाव घेत नाही तोच हल्लेखोरांनी पलायन केले. तर पोलिसांनी बेशुध्द पडलेल्या आरोपीला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली नेमकं या घटनेचा उद्देश काय ? होता आणखी पसार झालेले ते संशयित कोण ? याबाबत तपास चक्रे फिरवली जात आहे. शनिपेठचे निरिक्षक बळीराम हिरे आणि सहकार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली आहे. अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी सुध्दा घटनास्थळाची पाहणी करून तपासाला गती देण्याचे आदेश देण्यात आले आहे.