रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यातील चीनावल येथील इंडिकॅश कंपनीच्या एटीएम मधून तांत्रिक बिघाडामुळे अतिरिक्त पैसे मिळालेल्या ग्राहकांचे समाधान तर झाले मात्र आता पोलीस तपासाचे कुऱ्हाड देखील अतिरिक्त पैसे घेणार यांच्या मागे लागले आहे एटीएम मधून निघालेले अतिरिक्त पैशाची ग्राहक परत करतील त्यांची नावे पोलीस ठाण्यात देण्यात येणार नाहीत, मात्र जे ग्राहक अतिरिक्त पैसे परत देणार नाहीत त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा एटीएम कंपनीच्या चालकांनी दिला आहे.
तिला वन येथील टाटा इंडिकॅश कंपनीच्या एटीएम मधून जेवढे पैसे काढायचे आहेत त्याच्या पाच किंवा दहा पट जास्त पैसे निघत असल्याचे काही गाय ग्राहकांना माहिती झाली ही वार्ता गावात वार्यासारखी पसरली, रेटारेटी आणि लोटालोटी यातून अनेक आणि एटीएम मधून पाच ते दहा पट जादा पैसे काढले आणि आनंदोत्सव साजरा केला आणि आनंदात पाट्याही केल्या सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत एटीएम जवळ प्रचंड गर्दी आणि गोंधळ सुरू होता. त्यानंतर मात्र पोलिस ठाण्याचे पोलिस येतात पैसे काढणाऱ्यांना त्या ठिकाणाहून धूम ठोकली, पोलिसांनी काही युवकांना देखील त्या ठिकाणाहून हटकले या घटनेची जोरदार चर्चा जिल्हाभरात सुरू होती मंगळवार तसेच बुधवारी सकाळपासून एटीएम मधून कोण कोणत्या एटीएम कार्ड वरून आणि कोणत्या बँकेतून खात्यातून पैसे काढले त्याची माहिती गुरुवारी आमचे टेक्नीशियन आल्यानंतर व इंजिनियर आल्यानंतर आम्हाला कळेल. तोपर्यंत अतिरिक्त पैसे मिळाले आहेत त्यांनी ते स्वतःहून जमा करावेत असे आवाहन सीएमएस कंपनीचे कर्मचारी जितेंद्र सोनवणे यांनी केले आहे. ज्यांच्याकडून पैसे मिळणार नाहीत, त्यांची नावे कंपनी सावदा पोलीस ठाण्यात देणार आहे. त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल करणार आहे. एटीएमच्या भुतांच्या कथा देखील लोटालोटी तुटले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज आधार घेऊन एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो अशी माहिती त्यांनी यावेळी माध्यमांना दिली आहे.