(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार देवानंद लिलाधर भालेराव (वय 22) आणि समाधान राजू सोनवणे (वय 22) दोघेही रा. धनजीनगर, आसोदा, जळगाव या दोघांजवळ चोरीच्या मोटरसायकल असून दोघेही या मोटर सायकल विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशी म्हायती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या नव्या पथकाने गुप्त बातमीदार नेमून या चोरट्यांची माहिती मिळवली. दोघेही चोरटे सद्यस्थितीत घरी असल्याचे माहित पडताच दोघांनाही राहत्या घरून मोठ्या शिताफीने गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
या चोरट्यांकडून 3 मोटर सायकल जप्त करण्यात आल्या असून 379 कलमानुसार दोषी ठरवत दोघांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात करण्यात आलेले आहे. नशिराबाद आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे मोटरसायकल चोरीचे 1-1 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप पाटील, जयंत चौधरी, सुनील दामोदरे, विजय पाटील, पंकज शिंदे आदींचे नवे पथक तयार करण्यात आले असून या पथकाने ही कारवाई केली आहे. नुकत्याच झालेल्या कारवाई नुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 15 मोटरसायकल जप्त केल्या होत्या. त्यानंतर आज 3 चोरीच्या मोटर सायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.