जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : जिल्ह्याच्या शिवसेनेच्या युवती युवा सेने विस्तारक पदी डॉ. प्रियांका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्याच्या नियुक्तीने जिल्यातील सामाजिक आणि राजकीय कार्याला वेग येणार आहे. शिवसेनेत युवती सेनेची फळी उभारण्यासाठी डॉ. प्रियांका पाटील यांचा प्रयत्न राहणार आहे. पाचोऱ्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या डॉ. प्रियांका पाटील ह्या कन्या आहेत. त्यांच्या नियुक्तीने जिल्हातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी स्वागत केले आहे.