मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांची मतदार संघातील विविध विषय व समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्च केली यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे -खेवलकर यांचा समावेश आहे. ना. जयंत पाटील आणि रोहिणी खडसे यांच्या भेटीने जिल्हाच्या राजकीय पटलावर चर्चा सुरु झाली असून या भेटीचे रहस्य आद्यपही गुलदस्त्यात आहे. कारण काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी भुसावळच्या एका जाहीर कार्यक्रमात जळगाव जिल्हातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या गटबाजी संधर्भात काही पदाधिकाऱयांना कानपिचक्या दिल्या होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांची राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे -खेवलकर व कार्यकर्त्यांनी भेट घेऊन विकास कामांबाबत चर्चा केली असण्याचे सांगण्यात आले. यावेळी त्याच्या समवेत माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, पंकज येवले, बोदवड गटनेते कैलास चौधरी, दीपक झांबड, जिल्हा दूध संघाचे संचालक मधुकर राणे, प्रदीप बडगुजर, रामदास पाटील, भरत पाटील, प्रवीण पाटील, मस्तान कुरेशी, आसिफ बागवान बापू ससाणे, एजाज खान, सम्राट पाटील, किरण पाटील, विजय चौधरी, अजय पाटील, हर्ष कोटेचा, मनोज पाटील, आदी उपस्तित होते.