पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा : सद्यास्थितीत पावसाळयाचे दिवस असून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे पाचोरा शहरातील जिर्ण,पडाऊ झालेल्या जुन्या इमारतींना नगररचना विभागाकडून सदरच्या इमारती स्वखर्चाने पाडून इमारत तात्काळ मोकळी करुन सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करणे बाबत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी स्व:त शहरातील जिर्ण इमारतींच्या जागेवर जाऊन पाहणी करत संबधीत जागामालकांना,भाडेकरुंची चर्चा करुन धोकेदायक, जिर्ण , पडाऊ बिल्डींग तात्काळ रिकामी करण्याबाबत तयार केले.
याबाबत वृत्त असे कि संबंधीत मालकांना नोटीस देऊन सदर घरे, ईमारत अतिवृष्टीने कोसळून आपले जिवीत अथवा वित्त हानी झाल्यास, इतर लगतच्या रहीवाश्यांना हानी झाल्यास यात नगरपरीषदेची कोणतीही जबाबदारी राहणार नाही. नुकसान झाल्यास त्या करीता आपणास शासनाकडुन अगर नगरपरीषदेकडुन कोणतीही मदत वा अर्थसहाय्य मिळणार नाही ही आपली वैयक्तीक जबाबदारी असल्याबाबत कळविले आहे.
नोटीसा दिलेल्या इमारतींमध्ये पाचोरा शहरातील देशमुखवाडी, गांधी चौक, बाहेरपुरा तसेच शहरातील इतर भागातील पडाऊ इमारतींची समावेश आहे. यावेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी स्वत: शहरातील इमारतींची पाहणी करुन संबंधीत मालकांना, भाडेकरी नागरीकांना सक्त सुचना दिलेल्या आहेत.
यावेळी प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, नगररचनाकार मानसी भदाणे, रचना सहायक हेमंत क्षिरसागर, लिपीक प्रकाश पवार आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.