रावेर राजमुद्रा वृत्तसेवा :- केळी आलेल्या सिएमव्ही व्हायरस व कपाशीवर आलेल्या लाल्या रोगाची झालेली लागणमुळे शेतकर-यांचे नुकसान झाले असून शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपा किसान मोर्चा तर्फे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुरेश धनके यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन नायब तहसिलदार सि. जी. पवार यांना देण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, सरचिटणीस सि. एस. पाटील, महेश चौधरी, पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी, राहुल महाजन, पराग पाटील, प्रशांत वाणी, रजनीकांत बारी, आदी भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थितीत होते.