जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा :- जळगाव जैन समाजा चे सक्रिय सदस्य, युवा कार्यकर्ता प्रतीक भाई शेठ यांची भाजपा जैन प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्र विभागीय सह प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी दि. २१ सप्टेंबर २०२१ रोजी भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले. सदर कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ, संघटन मंत्री श्रीकांत भारतीय,वरिष्ठ नेते राज पुरोहित, महिला प्रदेश प्रमुख इशाताई कोलीकर, अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक संघटनेचे अध्यक्ष ललित गांधी, भाजपा जैन प्रकोष्ठ चे प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी आणि असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते. जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या नियुक्तीचे स्वागत होत आहे