(राजमुद्रा वृतसेवा) प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या कार्यकारणी पदी जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून भूषण अशोक भोळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या विभागाचे महाराष्ट्रातील कार्यालय नाशिक येथे आहे.देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या या अभियानांतर्गत महत्त्वपूर्ण कामे करण्याच्या हेतूने भूषण भोळे यांची जळगाव जिल्हा अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या नीतिमूल्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा स्तरावर केले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली. प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुकेश शर्मा तसेच राष्ट्रीय महामंत्री भगवान बागुल यांच्या स्वाक्षऱ्या असलेले प्रमाणपत्र देऊन भूषण गोळे यांना जिल्हाध्यक्ष हे पद बहाल करण्यात आले