जळगांव राजमुद्रा वृत्तसेवा : जळगावं शहरातील सर्व रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून वाहनचालक नागरीक यामुळे त्रस्त झाले आहेत. रस्त्यांच्या उदासीनतेमुळे सर्वसामान्य जनतेत प्रचंड नाराजी पसरली आहे. परंतु महापालीका याबाबत कुठल्याही हालचाली करीत नसल्याने अखेर महापौरांनी आपल्या दालनात तात्काळ बैठक घेवुन संबंधीत अधीकाऱ्यांना आ णि कार्यादेश नंतरही काम न करण्याऱ्या ठेकेदारांना धारेवर धरले आहे. निधी असूनही निवीदा काढण्याचे काम देखील महापालीकेकडून करण्यात येत नाही. त्यामुळे महापौरांनी पालीका प्रशासनाच्या भोंगळ कामावर नाराजी प्रकट करत ज्या ठेकेदांरांना कार्यादेश देऊनही कामांना सुरूवात केलेली नाही अश्या ठेकेदारांना काळया यादीत टाकण्याचे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान शहरातील रस्त्यांच्या कामांना पावसाळयानंतर सुरूवात होणार असल्याचे आश्वासन महापौरांसह सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. तसेच योग्य नियोजन नसल्यामुळे निधी असुनही त्या निधीतून होणा-या कामांच्या निवीदा थंडबस्त्यात पडून आहेत. तर अनेक कामांबाबत कार्यादेश देऊनही कामांना सुरूवात झालेली नाही. त्यामुळे पालीकेच्या पदाधिका-यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी ठेकेदारांना पुर्ण काम झाल्याशिवाय बीलाची रक्कम देऊ नये. तसेच सुटीच्या दिवशी देखील निवीदा काढण्याचे काम करण्यात यावे. रस्त्यांच्या डागडुजींसाठी अतिरीक्त चाळीस कामगारांची नियुक्ती करण्यात यावी. आदी सुचना दिल्यात. याप्रसंगी उपमहापौर कुलभुषण पाटील आयुक्त सतीश कुलकर्णी, विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन, माजी महापौर नितीन लढढा, नगरसेवक अनंत जोशी, शहर अभीयंता अरविंद भोसले, दिलीप पोकळे, नितीन बर्डे, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.