ठाणे राजमुद्रा वृत्तसेवा : रस्त्यांवर खडङयांचे साम्राज्य पसरलेले आहे. खड्डयामुळे प्रवाशांना 6 6 तास वाहतुक कोंडीत अडकुन पडावे लागत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही या खड्डयांमुळे वाहतुक कोंडीमुळे अडकुन पडावे लागले होते. या पार्श्वभुमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खड्डयांची पहाणी करुन अधिका-यांना धारेवर धरले. रस्त्यांची कामे निट करा नाहीतर ठेकेदारांना काळ्या यादीत टाका. खड्यांमुळे आम्हाला शिव्या खाव्या लागतात. अश्या शब्दात मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिका-यांना फटकारले.
त्यांनी शहरातील विविध रस्त्यांची पहाणी केली. यावेळी मनपाचे अधिकारी एम.एम.आर.डी.ए., पी.डब्ल्यु.डी. वाहतुक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन कामच्या दर्जाची पहाणी केली. यावेळी रस्त्यांची चाळण झालेली पाहुन शिंदे यांनी संताप व्यक्त करत अधिका-यांना धारेवर धरले. जे काम केले आहे ते चांगले करा. पावसाळया पुर्वी ज्या रस्तांची कामे करण्यास सांगितली होती. ती कामे पुर्ण करा. रस्त्यांमुळे लोक वैतागले आहेत. त्यामुळे आम्हाला शिव्या खाव्या लागल आहेत. रस्त्यांच्या कामात हलगर्जी पणा करु नका. अशा सुचनाही त्यांनी दिल्या. शहरातील रस्त्यांची कामे युध्द पातळीवर हाती घेण्यात आली आहेत. खड्डे लवकरात लवकर बुजवीले जाणार आहेत. पाऊस थांबला की रस्त्यांची कामे जोमाने सुरू करणार आहेत. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कत्रांटदारावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.