जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा : – जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या १९ मोटरसायकली जप्त केल्या असून आणखीन काही मोटरसायकली जप्त करण्याची कारवाई सुरू होती .
पहूर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये मोटरसायकली चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यामुळे दुचाकी धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
दरम्यान आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत पहूर येथून सुमारे १९ मोटरसायकली ताब्यात घेऊन त्या अजिंक्य हॉटेल येथे आणून जळगावला हलविण्यात आल्या आहेत यात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वीही सहा महिन्यांपूर्वी जुगार अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या होत्या . आज झालेल्या कारवाईने जुगाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . या गाड्यांच्या खरेदी विक्री चे ठिकाण पहूर येथे चालू असलेल्या जुगार अड्डेत्यामुळे मुख्य केंद्र असल्याचं दिसत आहे कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे . येथील जुगार अड्डे बंद करावी अशी नागरिकांची मागणी आहे.