जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने सेवा व समर्पण अभियानाच्या अंतर्गत दिनांक 24 सप्टेंबर रोजी म्हसावद येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत भाऊ महाजन ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर अभियान संयोजक मनोहर पाटील भाजपा माजी तालुकाध्यक्ष कैलास चव्हाण सर यांच्या हस्ते रक्तदात्यांचा गुलाब पुष्प व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील महेंद्र चव्हाण वसंतवाडी चे सरपंच आधार पाटील उमाळे ग्रामपंचायत सदस्य रघु भाऊ चव्हाण युवा मोर्चा तालुका सरचिटणीस भुषण पाटील युवा मोर्चा तालुका चिटणीस गिरीश वराडे कुसुंबा ग्रामपंचायत सरपंच संतोष पाटील वडली ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पाटील युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील तालुका चिटणीस हर्षल इंदलकर युवा मोर्चा सदस्य सागर घुगे ,तालुका उपाध्यक्ष कुणाल वाणी, दिग्विजय चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हे रक्तदान अभियान भाजपा जिल्हाध्यक्ष मा. राजू मामा भोळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रभाकर पवार,भाजपा तालुका अध्यक्ष गोपाळ भंगाळे, तालुका सरचिटणीस अरुण सपकाळे, संदीप पाटील, अभियान सहसंयोजक संजय भोळे, पंचायत समिती सदस्य ॲड हर्षल चौधरी, मिलिंद चौधरी, युवा मोर्चा चे सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडले गोळवलकर रक्तपेढी यांचे अनमोल सहकार्य यावेळी करण्यात आले आहे.