जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शासकीय सुट्ट्या मिळाव्या यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कामगार संघटना कार्यरत होत्या यामध्ये महत्त्वाचे प्रयत्न म्हणजे नगरसेवक चेतन सनकत यांनी वेळोवेळी महासभेत सफाई कामगारांना शासकीय सुट्ट्या मिळाव्या म्हणून आवाज उठवला होता त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. एक ऑक्टोंबर पासून सफाई कामगारांना शासकीय सुट्ट्यांचा लाभ घेता येणार आहे. असे परिपत्रक नुकतेच प्राप्त झाल्याने सफाई कामगारांना मध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
तब्बल पाच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर सफाई कर्मचार्यांना मिळणार शासकीय सुट्ट्यांचा लाभ महासभेमध्ये आरोग्य सभापती तथा नगरसेवक चेतन सनकत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सफाई कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. शासकीय सुट्ट्यांचा लाभ अधिकाऱ्यांना मिळतो मात्र सफाई कामगार प्रत्येक सणासुदीला देखील काम करत असतो. तसेच नगरपालिकेत सफाई कामगारांना शासकीय सुट्ट्यांचा लाभ मिळतो परंतु महापालिकेत सफाई कामगारांना शासकीय सुट्ट्यांचा लाभ मिळत नसल्यामुळे नगरसेवक चेतन सनकत यांनी महासभेत हा मुद्दा उचलल्यानंतर महापालिकेत शासनाकडून सफाई कामगारांना शासकीय सुट्ट्यांचा लाभ देण्यात येणार असल्याचे परिपत्रक नुकतेच प्राप्त झाल्याने सर्व सफाई कामगारांन मध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नगरसेवक चेतन संकेत यांनी केलेले प्रयत्न सार्थक ठरल्याने सफाई कामगारांनी विशेष आभार मानले आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज सफाई कामगारांना असल्यास न्याय मिळाला आहे. तसेच या निर्णयाचा 1 ऑक्टोबर 2021पासून अंबलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिल्याचे कळते आहे.