जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे शिवसेनेतून राष्ट्रवादी प्रवेश करत असल्याचे वक्तव्य आज चोपडा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व पूर्वाश्रमीचे शिवसेने नेते कैलास बापू पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी कार्यालयात माजी मंत्री छगन भुजबळ व माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार कैलास बापू पाटील यांचा प्रवेश सोहळा पार पाडण्यात आला आहे यावेळी शिवसेनेच्या माजी जिल्हा महिला प्रमुख इंदिरा पाटील यांचा देखील प्रवेश यावेळी करण्यात आला आहे.
शिवसेनेमध्ये नेत्यांपर्यंत अनेक तक्रारी केल्या मात्र कोणीही काहीही ऐकून घेतली नाही. पालकमंत्र्यांचे नाव न घेता त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांनी देखील आमचे ऐकून घेतले नसल्याचा आरोप माजी आमदार कैलास बापू पाटील यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेण्याचा प्रयत्न केला व पक्षात सुरू असलेल्या विषयांची माहिती दिली, मात्र न्याय मिळाला नसल्याची नाराजी देखील यांनी यावेळी माध्यमांसमोर व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे शेतकऱ्यांसाठी मोठे काम असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी प्रवेश करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून एका माजी आमदाराचा राष्ट्रवादी प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे सांगितले जात होते, मात्र नेमकं कोण माजी आमदार प्रवेश करणार याबाबत संभ्रम कायम होता. माजी आमदार कैलास बापू पाटील यांच्या झालेल्या प्रवेशानंतर अखेर संभ्रम दूर झाला आहे. शिवसेनेचे एकनिष्ठ असलेल्या कैलास पाटील यांनी अचानक राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने चोपडा विधानसभा मतदारसंघात राजकीय गणिते आता बदलण्याची शक्यता आहे यामुळे शिवसेनेच्या रूपात असलेला मतदान तसेच त्यांना मानणारा एक मोठा वर्ग यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय ठरणार आहे.
बोदवड मुक्ताईनगर येथील नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपस्थित केलेल्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीने देखील शिवसेनेला धक्कातंत्र वापरत राजकीय झटका दिला आहे. यामुळे महा विकास आघाडीतील कलगीतुरा जळगाव जिल्ह्यातून सुरू झाली आहेत. एकमेकाच्या पक्षातूनच आयात निर्यात करून महा विकास आघाडीत एक नवा वाद जळगाव जिल्ह्यातून चव्हाट्यावर आला आहे.