(नाशिक राजमुद्रा वृत्तसेवा) नाशिक येथील महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सीमा ताजने यांच्या पतीने सिने स्टाईल राडा घालत मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेच्या रुग्णालयाची तोडफोड केलेली आहे. सीमा ताजणे यांचे पती रेमडीसीविर इंजेक्शन मिळाले नाही म्हणून राग आल्याने ईनोवा गाडीने प्रवेशव्दाराच्या काचा फोडत थेट रुग्णालयात प्रवेश करत तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराने महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून गोंधळ उडाला होता.
या सर्व प्रकाराबाबतची माहिती पक्षश्रेष्ठींना कळवण्यात येणार असून पोलिसांना त्यांच्या पद्धतीने कारवाई करण्याची परवानगी देण्यात आली आहे हा प्रकार पूर्णपणे दुर्देवी असून याबाबत कारवाई करणार असणार याची माहिती नाशिक महापौर सतीश कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.