जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जे घाबरले त्यांनी भाजपमध्ये जावे, अशी खरमरीत टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जळगावात सुरू असलेल्या ओबीसी अक्का परिषदेदरम्यान पक्षांतर करणाऱ्यांवर केली आहे. मला जेलमध्ये टाकण्यात आले.. मी बदलणार नाही, ज्यांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांना नियती बघून घेईल असे देखील मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.
जळगाव मध्ये ओबीसी हक्क परिषदेचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज सभागृहात करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात ना छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडत आम्ही आरक्षण दिले यांनी काढून घेतले असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सध्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमात भेट देऊन आपली उपस्थिती देत आहे. केंद्राच्या ओबीसी डेटाच्या प्रकरणावरून देखील भुजबळ यांनी निशाणा साधला आहे