पुणे राजमुद्रा वृत्तसेवा । शिवसेना नेते संजय राऊत हे सध्या पुणे जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत बोलताना चिमटे काढले आहे, पिंपरी चिंचवड मधील कार्यक्रमात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री दिल्ली जाण्याची भाषा केली आहे. संजय राऊत चिंचवड येथील जाहीर सभेत जिल्ह्यात आपलं कोणी ऐकत नाही असं काही सांगतात. असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका. नाही तर मुख्यमंत्री गेलेच आहेत आज दिल्लीला, असं जाहीर विधान संजय राऊत यांनी केलं होतं. यामुळे थेट अजित पवारांच्या होम पिच्च वर जाऊन राष्ट्रवादी ला डिचवण्याचा प्रयत्न राऊत यांनी केला मात्र सायंकाळी वडगाव शेरी येथील भाषणात संजय राऊत बाजू सावरत मुख्यमंत्री शासकीय कामासाठी दिल्लीत गेले असल्याची बाजू शिवसेना नेते संजय राऊत यांनी सावरली आहे.
नेमकी काय बाजू सावरली ?
मुख्यमंत्री दिल्लीत गेल्याने लोक देव पाण्यात घालून बसले आहेत, ते मुंबईत परत आले आहेत. अमित शहांनाही भेटले. त्यांची कोणतीही वैयक्तिक चर्चा झाली नाही. ज्या शासकीय कामासाठी गेले होते तेवढेच काम करून परतले. पुढील तीन वर्षे पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील, असे राऊत यावेळी म्हणाले. अजित पवार आपलेच आहेत, एकत्र काम कराचंय. अजित दादांनी शिवसैनिकांना समजून घ्यावं. अजितदादा पवार या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्यासोबत आपण रीतसर बोलणी करू. मोठ्या पवार साहेबांना देखील बोलू. सन्मानीय आघाडी झाली तर उत्तमच आहे नाहीतर आपण आहोतच एकला चलो रे, असे बोलत राऊत यांनी संध्याकाळच्या सभेत मवाळ भूमिका घेतल्याने राजकीय कार्यकर्ते देखील आवक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.