मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । महाराष्ट्रातील पोट निवडणुकीमध्ये मोठी घडामोड घडताना पाहायला मिळत आहे. राज्यसभा निवडणूकीत परंपरागत भाजपने शब्द पाळत राज्यसभा निवडणुकीमधून मगर घेतली आहे, काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनाने होत असलेल्या पोटनिवणुकीतून, आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांना आपला उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी भाजप कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. कॉग्रेस नेत्यांची व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी नंतर हि महत्वपूर्ण घडामोड घडली आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एखाद्याच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची परंपरा असल्याची आठवण भाजपला करुन दिली होती. तसंच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. यावरून फडणवीस यांनी पक्ष श्रेष्टीशी चर्चा करून संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.