बीड राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराजी आता उघडपणे दिसून आयला सुरुवात झाली आहे. . मंत्रिपद न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके नाराज असल्याची जोरदार चर्चाना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बीड दौऱ्यात दांडी मारत त्यांनी आपला नाराजी अधिकृत केली आहे. त्यामुळे सोळंके नाराज च्या चर्चा जोरदार पणे माजलगाव भागात सुरु आहे.
आमदार प्रकाश सोळंके हे बीड जिल्हा राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते आहेत. सोळंके हे चार वेळा माजलगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. मंत्रिपद मिळाले नसल्याने सोळंके नाराज असल्याच्या चर्चा दोन वर्षांपूर्वीही होत्या. मात्र आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बीड दौऱ्यावर असतानाही सोळंके अनुपस्थित विविध राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहे.
महाविकास आघाडी स्थापन करताना दोन वर्ष सरल्यावर देखील अद्याप पर्यत मंत्री मंडळाचा विस्तार अथवा महामंडळे देखील वितरित करण्यात आलेली नाही यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये देखील नाराजीचे वातावरण आहे.