मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले आहेत. हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट करीत संजय राऊत यांच्या निशाणा साधला आहे. सामना मधून एमआयम चे राष्ट्रीय अध्यक्ष ओवेसी यांच्या वर लिहिण्यात आले लेखा नंतर आमदार पडळकर यांनी शिवसेनवर टीका केली आहे.
काय आहे सामना मध्ये ?
मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी या देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे असे सांगण्याची हिंमत ओवेसींमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी ओवेसी यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. त्यावरुन पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत हल्ला बोल केला आहे.
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले आहेत. हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील. त्यांनी ओवीसींची तुलना भाजपाचे अंगवस्त्र म्हणून केलेली आहे. पण याच ओवीसीला आलिंगन घालून मालेगावच्या सत्तेच्या इदीचा नजराणा तुम्ही पेश केला. एवढंच नाहीतर अमरावती मनपा मध्ये देखील सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली होती. आता ‘जनाब राऊत MIM की मुहब्बत कौन है?’ हे महाराष्ट्राला सांगायची आवश्यकता नाही. असा हल्ला बोल पडळकर यांनी केला आहे.