केंद्राच्या शेतकरीविरोधी कायद्या विरोधात बंद
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात तसेच केंद्र शासनाकडून केल्या जाणाऱ्या खासगीकरणाविरोधात जिल्हा काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज भारत बंदचे आवाहन केले होते. सकाळी दुकाने उघडली मात्र आंदोलकांनी सुरू असलेली दुकाने बंद करण्यास लावली. यामुळे शहरातील सर्वच बाजारपेठा सकाळी बंद झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिक़ाणच्या व्यापारी संकूलात जावून दूकाने बंद करायला लावली.
माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा मंगला पाटील, युवती अध्यक्षा कल्पीता पाटील, राष्ट्रवादीचे वाल्मीक पाटील, विनोद देशमुख, शहराध्यक्ष शरद पाटील, राष्ट्रवादीचे विलास पाटील, जिल्हा सरचिटणीस डी. जी. पाटील यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेत शहरातील बाजारपेठा बंद करीत व्यापाऱ्यांना आंदेालनात सहभागी हेाण्याची आवाहन केले.
देशाची आर्थिक स्थिती पूर्णत: ढासळली असून, शेतकरी अकरा महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे. मात्र, या जुलमी सरकारला त्यांची कीव येत नाही. शासनाकडून रेल्वे, बँक, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, सार्वजनिक उद्योग दूरसंचार व बंदरांचेही खासगीकरण केले जात आहे. देशात मात्र इंधनासह गॅसच्या किमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत त्यामुळे भारत बंदची हाक आज देण्यात आली होती.
केंद्र शासनाने शेतकरी विरोधी तीन कायदे पास केले. त्यासाठी पार्लमेंटमध्ये चर्चा केली नाही. शेतकऱ्यांबरोबरही चर्चा केली नाही. हे कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या आंदोलनात अनेक शेतकरी ठार झाले आहेत. यामुळे केंद्रा शासनाविरोधात आज भारत बंद आहे. हे आंदोलन काँग्रेस श्रेष्ठी सोनीया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानूसार
होत आहे.
डॉ. उल्हास पाटील
माजी खासदार
केंद्र शासनाच्या विरोधात आज राष्ट्रवादी व कॉँग्रेसतर्फ भारत बंद पाळण्यात आला आहे. सर्व दुकाने आम्ही बंद करून व्यापाऱ्यांना त्यात सहभागी करून घेत आहे. केंद्राने शेतकऱ्यां विरोधात कायदे केल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे, शेतकऱ्यांची लुट होत आहे.
यामुळे जळगावमध्येही आंदोलन मोठ्या प्रमाणात करीत आहे.
गुलाबराव देवकर, माजीमंत्री