मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने यापूर्वीच अटक केली असताना आता शिवसेना खासदार असलेल्या भावना गवळी यांना ईडी ने नोटीस पाठविल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर मालमत्ता संघटित केल्याचा आरोप[ असल्याचे सांगितले जात आहे. आता ईडीने आपला मोर्चा भावना गवळी यांच्याकडे वळवला आहे. खासदार गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडी कडून देण्यात आले आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
असे आहे आरोप ?
भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट को ऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
सईद खान ईडी कोठडी..
मनी लाँडरिंग अर्थात पैशांच्या अफरातफरी प्रकरणात भावना गवळी यांचा निकटवर्तीय असलेल्या सईद खानला सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती. . त्यांना ईडी कोर्टात हजर केलं असता 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यामुळे भावना चवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, शिवसेनेच्या एकाही नेत्याकडून याबाबत अद्याप जाहीर प्रतिक्रिया माध्यमांना देण्यात आलेली नाही.