नाशिक राजमुद्रा वृत्तसेवा | गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे त्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे मालेगाव मध्ये तब्बल तीन हजार हेक्टर पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे नाशिक परिसरात पावसाचे थैमान थांबता थांबत नाही नांदगाव, चांदवड ,निफाड सटाणा, दिंडोरी ,त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर या भागात धुवाधार पावसाने झोडपले आहे.
नद्या नाले दोघेही भरून वाहत आहे. तालुक्यातील बोलठाण यासह इतर गावांचा पाण्यामुळे संपर्क तुटला आहे. दिंडोरीतील गणेश बोंबाळे वैभव या तरुणाचा कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. शेतातल्या टोमॅटो वर फवारणी केल्यानंतर गणेश आंघोळीसाठी कालव्यात उतरला होता कालव्यातून बाहेर नेताना लोखंडी रोडला धक्का लागल्याने तो पुन्हा कालव्यात पडून त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नांदगावला 243 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच मालेगाव मध्ये पावसाने जोरदार शेतकऱ्यांना जोडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिक परिसरात गोदावरीला महापूर आलेला आहे अनेक भागात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.