जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा भाजपा, शिवसेना यांच्यात रस्सीकेच सुरु झाली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या विरोधात लवकरच शिवसेना पदाधिकारी अविश्वास ठराव आणणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहे. दुसरीकडे नागरिकांचे मूलभूत असलेले प्रश्न आणि समस्या विकास कामे पडून आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शीतयुध्द सुरू झाले आहे. या संदर्भात बैठक देखील झाले आहे. महासभेत येणाऱ्या अविश्वासाच्या विषयावरून भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी यांच्यात मतभेद असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेत आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव आल्यास त्याला भाजपचा विरोध राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव महासभेत मांडण्यात येणार आहे.
विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी बोलावलेल्या बैठकीत काही नगरसेवक उपस्थित होते, तसेच नगरसेविका ऍड. सुचिता हाडा यांनी देखील आयुक्तांच्या विरोधात असलेल्या ठरावाला पाठिंबा दिला होता, मात्र भाजप गटनेते यांची भूमिका तसेच आयुक्त आणि त्यांच्या कार्यपद्धती वादाच्या भोवऱ्यात सापडले.