जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्ह्यातील गावे, वस्तीत आणि रस्त्यांची नावे जातीवाचक असल्यास ती बदलून अशी सर्व गावे वस्ती आणि रस्त्यांना महापुरुष व लोकशाही मूल्यांची निगडित नावे देण्याची कार्यवाही तातडीने करावी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. सामाजिक न्याय विभागाने बदलण्याचे निर्देश दिले आहे. या पार्श्वभूमीवर गठीत समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी बैठकीस उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दीगंत होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील गावे आणि त्यांची नावे त्याऐवजी थोर महापुरुषांची नावे आतापर्यंत त्यांची नावे बदलण्यात आले आहे. त्यांना नावे देण्यात आले सहाय्यक आयुक्त पाटील यांनी सांगितले.