भुसावळ राजमुदा वृत्तसेवा । जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान भाजपा सोबत युती असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ला एकजगा मिळावी अन्यथा आम्ही स्वतंत्र निवडणुक लढाऊ तसेच पालिका जिप व पंचायत समित्या मध्ये देखील स्वबळावर लढविणार असा इशारा रीपाई आठवले गटातून युवा जिल्हा अध्यक्ष युवा जिल्हा अध्यक्ष रवींद्र सपकाळे खान्देश प्रभावी अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.रिपाई आठवले गटातील भाजपासोबत युती आहे. मात्र जिल्हा बँककेच्या निवडणूक प्रक्रियेत रिपाई निमंत्रण देण्यात आले नाही. हा प्रकार थांबेन रिपाईला एक जागा द्यावी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने जिल्हा बँकेची निवडणुक रिपाई आठवले गट स्वबळावर लढवेल असेही रवींद्र सपकाळे यांनी सांगितले. या बाबत माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हा अध्यक्ष सुरेश भोरे, आमदार संजय सावकारे यांना जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी, लक्ष्मण यादव व सर्व पदाधिकारी पत्र देऊन चर्चा करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.