जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी भवरखेडे येथे कोविड -१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
या ठिकाणी शिस्तबद्धरित्या नागरिकांना कोविड – १९ लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या चेहर्यावर समाधान पाहावयास मिळत होते. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी गावात प्रमुख ठिकानी भेटी देत नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत केले तसेच प्रशासन व शिवसैनिकांमध्ये समन्वय साधला. गावकऱ्यांनी काही समस्या प्रताप पाटील यांच्या समोर मांडल्या असत्या लवकरात लवकर समस्या सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले.
लसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरपंच किरण पाटील, उपसरपंच अजय तानकु ब्राह्मणे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर गुलाब पाटील, उगलाल पाटील ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना शाखाप्रमुख, स्वप्निल अधिकार पाटील युवा सेना शाखाप्रमुख, सतीश सुरेश पाटील युवा सेना संपर्कप्रमुख, संजय लोटन भामरे, राहुल सुभाष पाटील, उमेश सुनील पाटील युवा सेना उपशाखाप्रमुख, भूषण महाजन शिवसैनिक, विजय सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य, अजय बाविस्कर, योगेश संजय पाटील, महेश एकनाथ पाटील, मुरलिधर गोविंदा पाटील, किशोर माणिक पाटील, गिरीश दिनकर पाटील, अभय विजय देशमुख विकास सोसायटी सदस्य, मोतीलाल बाबुलाल पाटील, मुन्ना महाजन, ज्ञानेश्वर सखाराम पाटील माजी सरपंच व शिवसैनिक यांचे सहकार्य लाभले