बोदवड राजमुद्रा वृत्तसेवा । आपले कुटुंबीय आर्थिक सदन होते आपल्या बाप जाद्यांची मोठी शेत जमीन होती. त्यांचे वडील तर शिक्षक होते आपल्याकडे सुरुवाती पासून मालमत्ता होती, मात्र त्याने १२०० कोटी रुपयांची मालमत्ता कशी ? जमवली असा सवाल करत बीएचआर चा घोटाळा समोर आल्यानेचआपल्या मागे ईडीची चौकशी लावण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी एकनाथराव खडसे यांनी बैठकीत बोलतांना केला.
याबाबत माहिती अशी की, दोन दिवसांपासून एकनाथराव खडसे यांच्यावर ईडीची कारवाई झाली, त्यांना नोटीस बजावली याबाबत अफवा सुरू होत्या. त्यांची कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दोन दिवसात नाथाभाऊ चाहत्यांशी संवाद साधतील असे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर एकनाथराव खडसे बोदवड येथील कार्यक्रमाला उपस्थित राहिले. याप्रसंगी त्यांनी ईडीच्या कारवाईबाबत सांगितले.
खडसे म्हणाले की, माझे बापजादे श्रीमंत होते. त्यांची मोठी शेतजमीन आणि वाडे होते. याचे आधीपासूनचे उतारे आहेत. आपण कधीही भाड्याच्या घरात राहणारे नव्हतो. मात्र आ. गिरीश महाजनांचा उल्लेख न करता ते पुढे म्हणाले की, त्याचे वडील शिक्षक असतांनाही आज त्याची मालमत्ता १२०० करोड कशी ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बेनामी संपत्तीचा विचार करता हा आकडा अजून मोठा असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्याप्रमाणे एखाद्याचा जीव हा पोपटात असल्याचे म्हटले जाते. याच प्रमाणे त्यांचा जीव हा बीएचआरमध्ये असल्याने आपल्यावर ईडीची कारवाई करण्यात आल्याचा आरोप खडसे यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांची उपस्थिती होती.