मुक्ताईनगर राजमुद्रा वृत्तसेवा । येथून जवळच असलेल्या निमखेडी खुर्द येथील शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, अजय रुस्तम घोडकी (वय 38) हे नामक इसम हरताळा शिवारातील स्वतःच्या शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या अंगावर आज दुपारी २ ते २:३० वाजेच्या सुमारास वीज पडल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. त्याचा मृतदेह मुक्ताईनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे.