पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा । विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या असून राज्यपातळीवर शिवसेना, राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते एकत्रितपणे आघाडी धर्म पालनाचा संदेश देत आहे. आतापर्यंत आघाडी धर्म पाळण्यात जळगाव जिल्ह्यातच नव्हे, तर नासीक विभागात पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघ आघाडीवर राहिला आहे. म्हणुन ही भविष्यातील महाविकास आघाडीची नांदी असून हा आघाडी धर्म ग्रामीण भागातील सत्तेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादान आमदार किशोर पाटील यांनी केले. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा शासकीय विश्राम गृह येथे विविध ठराव असणाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ठराव असलेल्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी आमदार तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीपभाऊ वाघ अध्यक्षस्थानी होते.
या बैठकीत शिवसेनेचे आमदार किशोरआप्पा पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख अँड दिनकरबापु देवरे ,जि प सदस्य रावसाहेब पाटील, कृउबा प्रशासक सदस्य चंद्रकांत धनवडे, रणजीत पाटीलसर यांचेसह राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा श्री गो से हायस्कूल स्कूल कमेटी चेअरमन खलीलदादा देशमुख, नितीन तावडे, विकास पाटीलसर, शालिकग्राम मालकर, सिताराम पाटीलसर, प्रकाश निकुंभ, डिगंबरदादा पाटील , पाचोरा पिपल्स बँकेचे संचालक प्रा भागवत महालपुरे, प्रकाश एकनाथ पाटील विजय कडू पाटील, प्रल्हादभाऊ पाटील, सुनील पाटील,अँड अविनाश सुतार, डॉ पी एन पाटील, मोहन तावडे, जयसिंग परदेशी ,अरुण पाटील, रामधन परदेशी, हेमराज पाटील, बंडू पाटील, संजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
या बैठकीत नितीन तावडे, प्रा.भागवत महालपुरे, सिताराम पाटीलसर, खलीलदादा देशमुख यांनी मनोगत केले. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी येणार्या प्रत्येक निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सत्ता मिळवून देण्याचे प्रयत्न असतील आणि ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या तरच शक्य आहे. गुलाबराव देवकर यांनी खडसे साहेबांकडे जिल्हा बँकेसाठी माझ्या नावाची शिफारस केली असल्याचे सांगून आतापर्यंत भाजपाने केवळ स्वार्थासाठी राष्ट्रवादीचा वापर केला. येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला भुईसपाट करायचे आहे. निवडणुका कोणासोबतही होवोत आपल्या पक्षाची ताकत शेवटपर्यंत कायम ठेवा असे आवाहन श्री. वाघ यांनी केले.
आमदार किशोरआप्पा पाटील यांनी दिलीप वाघ यांना पाठिंबा दर्शवत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काय करायचे ते सर्वपक्षीय स्तरावर स्पष्ट होईलच पण दूध संघ राष्ट्रवादीसाठी सोडणार असल्याची ग्वाही दिली. दिलीप वाघ सोसायटी,ओबीसी मतदार संघातून लढायचे असेल तर माझा पाठिंबा राहिल. जिल्हा बँकेत आपल्या तालुक्यातुन दोन सदस्य गेले तर आनंदच होईल असे स्पष्ट करून ग्रामीण भागातील सत्तेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आघाडी धर्म पोहोचणे आपले काम आहे असे आवाहन केले. जिल्हा बँकेच्या जागावाटपा नंतर उमेदवारीचा चेंडू पक्षश्रेष्ठींकडे जाईल. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य करावा लागेल असे स्पष्ट केले व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उदार अंत:करणाने बोलावून माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी दिलीपभाऊ वाघ यांचे तोंड भरून कौतुक केले .तसेच जिल्हा बँकेतील सत्ता म्हणजे काटेरी मुकुट व तारेवरची कसरत आहे परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण तेथे प्रतिनिधित्व करणे गरजेचे असल्याचे सांगितले. नितीन तावडे यांनी प्रास्ताविक केले. विकास पाटील यांनी सूत्रसंचालन तर रणजीत पाटीलसर यांनी आभार मानले.