जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आ. गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या टिक्के नंतर त्यांनी खडसे यांना आव्हान देत होऊन जाऊ द्या.. दूत का दूध पाणी का पाणी.. असे सांगितले दिले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शिक्षकाचा पोरगा असताना एवढे १२ कोटी कुटून आणले असा सवाल उपस्थित केला होता वरून आज त्या वक्तव्याचा समाचार घेत आ. गिरीश महाजन यांनी जर खडसेंचे आरोप खरे असतील तर ते सरकार मध्ये आहे. त्यांचे सरकार मध्ये चांगले वजन असून त्यांनी माझी देखील चौकशी लावावी आणि कोना कडे काय आहे ? होऊन जाऊ द्या असे आवाहन महाजन यांनी खडसे यांना दिले आहे.
बोदवड येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खडसे यांनी माझ्या मागे ईडी बीएचआर प्रकरणामुळे लावण्यात आली असा गंभीर आरोप करून राजकीय खळबळ उडवून दिली होती. ”माझे वडिलधारे सधन होते. मात्र ज्याचे वडील मास्तर होते, त्याच्याकडे हजार-बाराशेची प्रॉपर्टी आली कशी ? त्याच्याबाबत अनेकदा मागणी करूनही चौकशी का झाली नाही ?” अशा प्रश्नांची सरबत्ती करत आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी नामोल्लेख केला नसला तरी याचा सर्व रोख आ. गिरीश महाजनांकडे असल्याचे स्पष्ट झाले होते. खडसेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राजकीय खळबळ उडाली होती.
महाजनांनी दिलेल्या आव्हानामुळे खडसे महाजनांच्या मालमत्ते संदर्भात तक्रार करून त्याचे आव्हान स्वीकारतात का ? याकडे आता राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून आहे. महाजन – खडसे संघर्ष नवा नसला तरीही दोघांनी एकमेकांवर केलेल्या आरोपामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.