चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा । मध्ये आभाळाची कोसळधार थांबायला तयार नसल्याने आज पहाटे पाच वाजता गत ३२ दिवसात सहाव्यांदा पूर आला आहे. तालुक्यात यावर्षी विक्रमी पर्जन्यमान झाल्याने जवळपास ८८ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात दोन दिवसानंतर पून्हा जोरदार पाऊस आज रात्री पडला आहे. शुक्रवारी मध्यरात्री कन्नडसह पाटणादेवी जंगल परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने डोंगरी नदीलाही पूर आला. त्यामुळे शेतांमधील पाण्याचा निचरा होणे थांबले असून शेत शिवार जलमय झाले आहे.
अति पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले खरिप पिकांचे नुकसानीमुले शेतकरी हवालदील झाला आहे.