(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) शासनाच्या कडक निर्बंधांचे परिणाम म्हणून सध्या जिल्ह्यतील लोककलावंत आणि अंध व्यक्ती याच्यावर आलेल्या उपसमारीवर सामाजिक बांधिलकी म्हणून रोटरी क्लब जळगाव यांच्या वतीने अंध व्यक्ती आणि लोककलावंतांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जवळजवळ 70 अंध व्यक्ती आणि कलाकारांना किट वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील 50 अंध व्यक्तींना आणि भडगाव येथील लोककलावंत परशुराम सूर्यवंशी ह्यांच्या माध्यमातून नगरदेवळा येथील 20 कलावंतांच्या परिवाराला हे किराणा किट वाटप करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने अंध व्यक्तींना मदतीची गरज भासून येत आहे. सोबतच कलाकारांवरही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती पाहता सामाजिक जाणिवेतून या उपक्रमाची मदत निर्माण केली असल्याचे रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट जॉईन सेक्रेटरी डॉ. तुषार फिरके यांनी सांगितले.
या प्रसंगी रोटरी क्लब प्रेसिडेंट जितेंद्र ढाके, सेक्रेटरी डॉ. काजल फिरके, डिस्ट्रिक्ट जॉईन सेक्रेटरी डॉ. तुषार फिरके, राष्ट्रवादी काँग्रेस महानगर अधक्ष्य अभिषेक पाटील, सांस्कृतिक सेल तथा जिल्हाध्यक्ष गौरव लवंगले, प्रमुख सल्लागार रमेश भोळे, GM फाउंडेशनचे होनाजी चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते हे किट वाटप करण्यात आले. यांच्यासह या कार्यक्रमात विभावरी मोरांकर , प्रदीप भोई, विशेष सहकार्य रोटरी क्लब, कल्पेश देशमुख आदी सहकारी उपस्थित होते.